[TET Exam] शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु; अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर

👉 आता शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी

👉 आता शिक्षक भरतीस[TET] पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 10 ऑक्टोबरला  होणार आहे. 


[TET Exam] शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु; अर्ज कुठे करायचा? वाचा सविस्तर


😷 शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा[TET Exam] बऱ्याच कालावधी नंतर घेण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.    


ℹ️ टीईटी[TET] परीक्षचे दोन गट


साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. 


🌐 अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट?


टीईटी परीक्षा[TET Exam] महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 3 ऑगस्टपासून सुरु होईल.


परीक्षा शुल्क 

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल. 


पात्रता 

टीईटीचा पेपर 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे


📍 टीईटीचे वेळापत्रक


▪️ ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी : 

3 ते 25 ऑगस्ट


▪️ प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 

25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर


▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - एक : 

10 ऑक्टोबर (वेळ- सकाळी साडेदहा ते दुपारी एक)


▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर - दोन : 

10 ऑक्टोबर (वेळ - दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार)


🎯 हि माहिती नक्की शेअर करा..!