🎒 राज्यातील काॅलेज सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा!!

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातली सर्व शाळा महाविद्यालये सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. ऑनलाईन शिक्षणावरच सध्या सगळा भर आहे. मात्र आता महाविद्यालये उघडण्यासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली.  मंत्री सामंत म्हणाले..:

▪️ मंत्री सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की... येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

▪️ तर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. तसंच नवीन शैक्षणिक वर्ष कसं असावं त्यासंबंधीची माहिती दिली जाईल" असं उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. 

📍 दरम्यान, या पत्रकार परिषदेवेळी मंत्री सामंत यांनी राज्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत सीईटी परीक्षा घेतली जाणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.