मोबाईलमध्ये सिम ठेवण्याचा नियम बदलला; नवीन नियम जाणून घ्या!
📍 दूरसंचार विभागाने (DoT) एक नवीन नियम जारी केला आहे, ज्यामध्ये जास्त सिम ठेवण्याची सूट रद्द करण्यात आली आहे.
Image source: businessleague |
💁♂️ नवीन नियमांनुसार आता 9 पेक्षा जास्त सिम असणा-या युझरला सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक झाले आहे.
🤓 या सिमकार्डचे व्हेरिफिकेशन न केल्यास ते बंद केले जातील. जम्मू आणि काश्मीर (J&K) आणि ईशान्य राज्यांसाठी ही संख्या फक्त सहा आहे.
🗣️ दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नियमांनुसार वापरात नसलेले सर्व मोबाइल नंबर डेटाबेसमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.
✔️ आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल, ऑटोमेटेड कॉल आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्याच्या उद्देशाने दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.
🔎 युझर्सना नोटिफिकेशनचे आदेश :
● DoT ने सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असलेल्या युझर्सना नोटिफिकेशन पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
● अशा सिमकार्डवरील सर्व आउटगोइंग कॉल 30 दिवसांच्या आत थांबवावेत तर इनकमिंग कॉल 45 दिवसांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
● मात्र, मोबाईल सिम युझर्सना अतिरिक्त सिम सरेंडर करण्याचा पर्याय देखील असेल.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!