दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

👨‍🏫 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या प्रात्येक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


👍 दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022पर्यंत चालतील. तर, बारावीच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चच्या दरम्यान होतील. 


🔎 मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट देऊ शकता.


💫 यंदा या परीक्षांना दहावी आणि बारावीचे जवळपास 35 लाख विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे. ऑफलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


✨ कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व नियम पाळले जातील असे मंडळाकडून सांगण्यात आलंय. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!