{मुदतवाढ} बँकिंग क्षेत्रात मोठी संधी! IBPS मार्फत १०,२७७ लिपिक पदांची मेगा भरती : IBPS Clerk Bharti 2025
बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने सहभागी बँकांमध्ये लिपिक संवर्गातील ग्राहक सेवा सहयोगी पदांच्या १०,२७७ जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. 'CRP CSA XV EXAM-2025' या सामाईक भरती प्रक्रियेअंतर्गत बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक तसेच पंजाब आणि सिंध बँक या बँकांमध्ये नियुक्त्या होणार आहेत.
इतर जाहिरात :➡
राज्यनिहाय १०,२७७ ग्राहक सेवा सहयोगी पदांचे वाटप
महाराष्ट्रात सर्वाधिक ११७० जागा उपलब्ध असून,
उत्तर प्रदेशमध्ये १३१५ आणि कर्नाटकमध्येही ११७० पदे भरली जाणार आहेत.
संपूर्ण राज्यनिहाय वाटप पुढीलप्रमाणे:
- अंदमान-निकोबार (१३),
- आंध्र प्रदेश (३६७),
- अरुणाचल प्रदेश (२२),
- आसाम (२०४), बिहार (३०८),
- चंदीगड (६३),
- छत्तीसगड (२१४),
- दादरा नगर हवेली व दीव दमण (३५),
- दिल्ली (४१६),
- गोवा (८७),
- गुजरात (७५३),
- हरियाणा (१४४),
- हिमाचल प्रदेश (११४),
- जम्मू-काश्मीर (६१),
- झारखंड (१०६),
- केरळ (३३०),
- लडाख (५),
- लक्षद्वीप (७),
- मध्य प्रदेश (६०१),
- मणिपूर (३१),
- मेघालय (१८),
- मिझोराम (२८),
- नागालँड (२७),
- ओडिशा (२४९),
- पुदुच्चेरी (१९),
- पंजाब (२७६),
- राजस्थान (३२८),
- सिक्कीम (२०),
- तामिळनाडू (८९४),
- तेलंगणा (२६१),
- त्रिपुरा (३२),
- उत्तराखंड (१०२)
- पश्चिम बंगाल (५४०).
शैक्षणिक अर्हता :
उमेदवारांनी भारत सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकार मान्य समकक्ष अर्हता धारण केलेली असावी. (पदनिहाय तपशीलवार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात पहावी.)
इतर जाहिरात :➡
वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांदरम्यान असावे. वयोमर्यादेत शिथिलता: अनुसूचित जाती/जमाती - ५ वर्षे, इतर मागास वर्ग (नॉन-क्रिमीलेअर) - ३ वर्षे, दिव्यांग - १० वर्षे, माजी सैनिक (३ वर्षांपेक्षा जास्त सेवा) - कमाल ५० वर्षे वयोमर्यादा (SC/ST दिव्यांग माजी सैनिकांसाठी ८ वर्षे अतिरिक्त). विधवा, घटस्फोटित व कायदेशीररित्या विभक्त महिला (पुनर्विवाह न केलेल्या) - सामान्य/EWS साठी ३५ वर्षे, OBC साठी ३८ वर्षे, SC/ST साठी ४० वर्षे.
ऑनलाइन नोंदणी १ ऑगस्ट २०२५
अर्जाची अंतिम मुदत :
२१ ऑगस्ट २०२५ 28 ऑगस्ट 2025पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
- प्रिलिम्स हॉलतिकीट सप्टेंबर २०२५
- प्रिलिम्स परीक्षा ऑक्टोबर २०२५
- प्रिलिम्स परीक्षेचा निकाल नोव्हेंबर २०२५
- ऑनलाइन मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२५
- प्रोव्हिज्नल अलॉटमेंट मार्च २०२६
इतर जाहिरात :➡
संपूर्ण माहितीसाठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.