HSC Result 2021: बारावी निकालसंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE)बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. करोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली ह

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE)बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. करोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्याना विशिष्ट सूत्रानुसार गुण देण्यात येणार आहेत. जाणून घेऊया बारावीच्या निकालासंदर्भातील सर्व प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे...



Q. -HSC 2021 Result बारावी निकाल कधीपर्यंत? 

A. - सर्वोच्च न्यायालयाने सर्व केंद्रीय शिक्षण मंडळे आणि राज्याच्या शिक्षण मंडळांना जुलै अखेरपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामुळे बारावीचा निकालही लवकरच जाहीर होईल, अशी शक्यता आहे. 


Q. - HSC 2021 Result कुठे पाहता येणार? 

A. - मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ mahahsscboard.in येथे तसेच mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. शिवाय दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीसाठीही बोर्ड निकालाची लिंक जाहीर करेल. 



Q. - बारावीच्या निकालासंदर्भात लेटेस्ट घोषणा कोणती? 

A. - राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना त्यांचा बारावीचा सीट नंबर जाणून घेण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्याची घोषणा गुरुवारी २९ जुलै रोजी केली होती. 


Q. - बारावीचा निकाल कसा तयार होणार? 

A.- ३०:३०:४० या सूत्रानुसार बारावीचा निकाल तयार केला जाणार आहे. यानुसार, दहावीच्या बेस्ट ३ विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के वेटेज, अकरावीच्या वार्षिक परीक्षेच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापन (ज्यु. कॉलेजमध्ये झालेल्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा) ४० टक्के वेटेज यावर आधारित गुण दिले जाणार आहेत. 


Q. - गेल्या वर्षी म्हणजेच २०२० चा बारावीचा निकाल किती होता? 

A. - बारावीचा २०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा निकाल ९०.६६ टक्के होता. मात्र यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी ९५ टक्क्यांहून अधिक असण्याची दाट शक्यता आहे.



source